Mutual Fund Scheme : प्रत्येकजण स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबासाठी कोणत्या ना कोणत्या योजनेत गुंतवणूक करतात. वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून गोळा करण्यात आले पैसे जेव्हा कंपनीचे शेअर्स, स्टॉक किंवा बाँड खरेदी करण्यासाठी गुंतवले जाते तेव्हा म्युच्युअल फंड तयार होतो.
याच म्युच्युअल फंडात अनेक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत गुंतवणूकदारांना जोखीम घ्यावी लागते. मात्र यात जबरदस्त परतावा मिळतो. जर तुम्ही आता यात गुंतवणूक केली तर तुम्हाला 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल.

समजून घ्या संपूर्ण गणित
जर तुम्हाला 10 वर्षांनंतर म्युच्युअल फंडात किती परतावा मिळेल हे समजून घ्यायचे असल्यास त्याची गणना करणे चांगले आहे. यामध्ये परतावा कधीकधी जास्त असू शकतो तर कधीकधी तो कमी असतो. जर तुम्हाला groww.in च्या गणनेतून समजले असल्यास तुम्ही एकरकमी म्युच्युअल फंडात 50 हजार रुपये दिले तर 10 वर्षांनंतर 12 टक्के परतावा येणे अपेक्षित आहे.
त्यामुळे या अपेक्षेनुसार, तुम्हाला 77,646 रुपये मिळू शकतील. यात अंदाजे परतावा 52,646 रुपये व्याज आणि 25 हजार गुंतवणुकीची रक्कम मिळू शकते. तर दुसरीकडे, तुम्ही Grow.in नुसार स्पष्टीकरण दिले तर तुम्हाला SIP द्वारे चांगले परतावे मिळतात.
जर तुम्ही दर महिन्याला 25 हजार रुपये SIP द्वारे गुंतवले तर तुम्हाला 10 व्या वर्षी 12% परतावा मिळू शकतो. तर त्यानुसार एकूण रक्कम 58,08,477 रुपये इतकी आहे.10 वर्षातील तुमची एकूण गुंतवणूक 30 लाख रुपये असून ज्याचा परतावा 28, 08477 रुपये इतका आहे.
तुम्हाला आता म्युच्युअल फंडातील दोन्ही गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही लंपसम कॅल्क्युलेटरची मदत घेऊ शकता. त्याशिवाय आता त्याच्या मदतीने तुम्ही निश्चित परतावा, एकूण परतावा, वार्षिक परतावा, पॉइंट टू पॉइंट रिटर्न यांसारख्या अनेक गोष्टी सहज समजू शकता.