वाळू तस्करांची मुजोरी; महिला तलाठ्यास केली शिवीगाळ

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात वाळू तस्करी वाढू लागली आहे. आणि दिवसेंदिवस या वाळू तस्करांचा धुडगूस देखील वाढू लागला आहे. कायद्याला पायदळी तुडवत हे तस्कर खुलेआम आपला व्यवसाय चालवत आहे.

सरकारी अधिकाऱ्यांचा देखील यांना धाक उरलेला नाही आहे. अशीच काहीशी घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा ठिकाणची पाहणी करण्यासाठी गेलेल्या

एका कामगार तलाठी महिलेस अश्लिल शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका जणावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील महिला कामगार तलाठी व दोन कर्मचारी चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदीपात्रात पाहणी करीत असताना तेथे वाळू तस्करी करणारा महेश राजेंद्र सोनवणे आला व त्याने महिला तलाठीस तू माझे वाळूचे तरफा कोणाला विचारून सोडून दिले.

असे म्हणून अश्लिल भाषेत शिवीगाळ करून लज्जा उत्तन्न होईल, असे वर्तन करून तू कशी काम करते? तेच पाहतो, अशी धमकी देऊन महिला तलाठी हिचा विनयभंग करून सरकारी कामात अडथळा आणला. दाखल फिर्यादीवरून महेश राजेंद्र सोनवणे याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe