कोल्हापूर : भाजप (BJP) नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल एक खुलासा केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये बोलता असताना नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या भाष्याचा व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. नरेंद्र मोदी हे किती वेळ काम करतात आणि किती वेळ झोपतात याबद्दल सांगितले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्याला आगामी काळात एकनं एक निवडणूक जिंकावी लागणार आहे. 2024 ला आपल्याला 400 पेक्षा जास्त जिंकायच्या आहेत. काही गोष्टी करण्यासाठी तीन चर्तुर्थांश बहुमत आवश्यक आहे.
चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये आपण कमी पडलो असतो तर राष्ट्रपती निवडणूक आपण गमावली असती. एक मोदी तयार होण्यासाठी अनेकजण मेहनत करत असतात. मोदी यांनी त्यांच्यावर होणारी मेहनत वाया जाऊ दिली नाही. ते 22 तास काम करतात.
नरेंद्र मोदी एक प्रयोग करतात त्यामध्ये त्यांना झोपावं लागणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नरेंद्र मोदी सकाळी 6 वाजता फोन करतात त्यामुळं मंत्री पाहाटे 5.30 वाजल्यापासून सतर्क असतात. आता त्यांना रात्रभर सतर्क राहावं लागेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
कोल्हापूर मध्ये (Kolhapur) काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यामुळे जागा रिक्त झाली आहे. यावेळी भाजपने कार्यकर्ता मेळावा घेतला तेव्हा चंद्रकांत पाटील बोलत होते.