NCP MLA : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सत्ताधारी पक्षांकडून टार्गेट केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने पक्षाला रामराम ठोकला आहे.
गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्षांकडून या निवडणुकीसाठी जोर लावला जात आहे. मात्र गुजरातमधील राष्ट्रवादीच्या आमदाराने राष्ट्रवादीला जोर का झटका दिला आहे.

कंधाल जडेजा असं या आमदाराचे नाव आहे. या आमदाराने नाराज होत राजीनामा दिला आहे. तसेच समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातमधील एकमेव आमदार होते.
गुजरात विधानसभा निवडणुकीची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने नारकल्याने आमदार नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
कंधाल जडेजा यांनी समाजवादी पक्षाकडून कुटियाना मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कंधाल जडेजा हे २ वेळा आमदार झाले होते. मात्र यंदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र गुजरात निवडणूक लढवणार असल्याने ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली.
गुजरातची निवडणूक ही २ टप्प्यामध्ये होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने निवडणुकी आधीच युती केली आहे. त्यामुळे नाराज आमदार यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.