“शरद पवार दाऊदचा माणूस” निलेश राणेंच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

Published on -

ठाणे : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चांगलीच आक्रमक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

निलेश राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात (Noupada Police Station) जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने फिर्याद दिली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटले होते की शरद पवार हे दाऊदचे माणूस आहे, पाकिस्तानचा एजंट असे म्हंटले होते. त्यानंतर त्यांचे बंधू बंधू नितेश राणे यांनी देखील निलेश राणे यांच्या सुरत सूर मिसळत शरद पवार यांच्यावर आरोप केले होते.

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील शरद पवार यांना दाऊदचे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट असा उल्लेख केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी राणे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, राणे बंधू हे वारंवार आमचे श्रद्धेय शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका करीत असतात.

ही टीका आणि आरोप करण्यापूर्वी निलेश आणि नितेश या राणे बंधुंनी आपली उंची तपासावी, त्यानंतरच सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करावा. आदरणीय पवार साहेब हे निलेश आणि नितेश राणे यांच्या वयापेक्षा अधिक सामाजिक जीवनात सक्रीय आहेत.

याची जाणही या राणे बंधूंना नाही. राणे बंधूंची आजवरची कारकिर्द पाहता त्यांनी आपली वैचारिक कुवत ओळखून भाष्य करावे; अन्यथा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe