अहिल्यानगर शहरातून जाणारी अवजड वाहने बंद करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलची मागणी, शहर पोलीस उपाधीक्षकांना निवेदन

Published on -

अहिल्यानगर- शहरालगत असणाऱ्या बायपास वरून वाहतूक सुरू झाली असतानाही अवजड वाहने मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरांमध्ये येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार पोलीस प्रशासनाला विनंती करून देखील ही अवजड व अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे, ती तातडीने बंद करून कारवाई करण्याची मागणी शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी निवेदनाद्वारे केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, प्रा. माणिकराव विधाते, सुरेश बनसोडे, सागर गुंजाळ, सुरज शहाणे, स्वप्निल भोर, ओंकार आव्हाड, भाऊ वनवे, अनिकेत होनराव, अतुल कचरे, संजय होनराव, शिवम होनराव, ओम होनराव, समर्थ होनराव, कौशल काटकर, सचिन होनराव, अतुल कचरे, कृष्णा हरबा, श्रवण बोरा, अक्षय काटकर, अभिषेक मिसाळ, विशाल तोडकर, अभिजीत गंधे, अथर्व कुलकर्णी, जय वर्मा आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले की, अहिल्यानगर शहरातील राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग तसेच बाजारपेठ रस्त्यांवर कायम अवैध प्रवासी वाहतूक व अवजड वाहतूक करणारे हे कधीही सुस्थितीत वाहने चालवत नाही. तसेच, काही अवजड वाहनांतील चालक हे मद्य प्राशन करुन वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून सदर वाहनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच शहरात सध्या विविध रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतिपथावर आहेत. परंतु, ज्या रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत त्या ठिकाणाहून अशी वाहने राजरोसपणे वाहतूक करतात. तसेच, काही दिवसांपूर्वी जड वाहतुकीमुळे सुरेखा गुरुलींगअप्पा होनराव यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. बाह्यवळण रस्ता पूर्णतः कार्यान्वित झालेला असून त्याचा वापर केला जात नाही.

त्यामुळे अवजड वाहतूक ही शहरांतर्गत होत आहे. वारंवार वाहतूक शाखा तसेच प्रशासनाला सुचना देऊन देखील कुठल्याच प्रकारच्या उपाययोजना जड वाहतुकीबाबत होत नाही. त्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे. तरी अहिल्यानगर शहरातील अवैध प्रवासी वाहतूक व अवजड वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी बंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला.

शहरात जागो-जागी रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यात अवजड वाहने शहरात येत आहेत. मालट्रक वरील चालक मद्यप्राशन करून वाहने चालविता. त्यामुळे अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव जात आहेत. शहर वाहतूक पोलीस नेहमीच बघ्याची भूमिका घेत आहेत. येत्या चार दिवसांत शहरातून होणारी अवजड वाहतूक न थांबल्यास आंदोलन करण्यात येईल.
-वैभव ढाकणे, शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

शहरात येणाऱ्या अवजड वाहतुकीवर कारवाई केली जाईल. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. शहरातील चौकाचौकातील सिग्नल तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या पॅगो रिक्षा यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. – अमोल भारती, पोलीस उपअधीक्षक

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!