NDA Recruitment 2023 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण डिफेन्स अॅकॅडमी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे येथे भरती सुरू आहे.
ही भरती प्रक्रियेद्वारे, लोअर डिव्हिजन क्लर्क, पेंटर, ड्रॉट्समन, मोटर ड्रायव्हर, प्रिंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, कुक, फायरमन, लोहार, सायकल रिपेयरर आणि मल्टी टास्किंग स्टाफची पदे भरली जातील. या भरतीअंतर्गत एकूण 251 रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
वेगवेगळ्या पदांसाठी 10वी, 12वी पास ते ITI पदवी अशी पात्रता विहित केलेली आहे. पदांनुसार, तुम्ही नोटिफिकेशनमधून शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती मिळवू शकता. याशिवाय उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे. काही पदांसाठी ते 18 ते 25 वर्षे आहे.
कुठे अर्ज करायचा?
उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ndacivrect.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी पर्यंत आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी चाचणी आणि स्क्रीन टेस्ट घेतली जाईल. रिक्त पदांच्या 10 पट उमेदवारांना लेखी परीक्षेत बसण्याची संधी दिली जाईल.