पालकांसाठी मुलगा असो की मुलगी त्यांत ते फरक कधी करत नाहीत. सगळी मुलं आई वडिलांसाठी समान असतात. परंतु मुली त्यांच्या पालकांशी जास्त अटॅच असतात.
असे म्हटले जाते की मुली या भावनांचा महासागर असतात. त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते, मग ते कोणी बोलले तरी त्या ते गोष्टी मनावर घेतात. पालकांनी आपल्या मुलांच्या भावना दुखावतील अशा गोष्टी कधीही सांगू नयेत.
काही वेळा काही पालक आपल्या मुलींबद्दल बेफिकीर असतात आणि त्यांच्या मनावर वाईट परिणाम होईल असे बोलतात. मुलगा असो वा मुलगी, पालकांनी त्यांच्याशी बोलताना संयम बाळगावा, जेणेकरून रागाच्या भरातही मुलांशी बोलताना चुकीचे बोलणार नाहीत.
याठिकाणी आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यांचा उल्लेख तुम्ही चुकूनही आपल्या मुलीसमोर करू नये, अन्यथा तिच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
1. भावाकडे पहा, तो अधिक चांगला आहे :- अनेकदा आपली मुलगी चुका करते किंवा अभ्यासाकडे लक्ष देत नाही, तेव्हा आई-वडील तिला आपल्या भावाकडे बघायला सांगतात, तो खूप चांगला आहे असे काहीसे म्हणतात. पण यामुळे तिच्या मनात चुकीच्या गोष्टी निर्माण होईल. आपल्या मुलीला वाटेल की आपण तिच्यावर तिच्या भावापेक्षा कमी प्रेम करता. त्याच गोष्टी तुम्ही त्याला दुसऱ्या प्रकारे समजावून सांगू शकता.
2. घरातील कामांकडे लक्ष द्या:- सर्वप्रथम मुलींनीच घरची कामे करावीत, हा विचार सोडून द्या. मुलींनी घरची कामे करावीत, असे अनेक पालकांचे म्हणणे असते, पण ते भावाला असे म्हणत नाहीत. हे पाहून तिला त्रास होऊ शकतो. दोघांनाही एकाच पद्धतीने सर्व काही शिकवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कोणीही दुखावले जाणार नाही.
3. मुलांसारखे वागू नको :- मुलांना जे आवडतं ते करू द्यायला हवं. विशेषतः मुलींना मुलांसारखे वागू नका, असे वारंवार सांगू नका. यामुळे तिला त्रास होऊ शकतो.
4. तुम्ही सासरी निघून जाल :- बर्याच वेळा नोकरी वगैरे बद्दल चर्चा होते तेव्हा पालक भविष्यासाठी आपल्या मुलावर अवलंबून असण्याबद्दल बोलतात. ते आपल्या मुलींना सांगतात की तुम्ही सारी निघून जाल मुलगाच सांभाळणार आहे. आणि याचा त्यांना सर्वात जास्त त्रास होतो. मुलींनाही म्हातारपणी त्यांच्या आई-वडिलांना आधार द्यायचा असतो, म्हणून त्यांना असे कधीच बोलू नये.
5. कमी खा :- अनेक पालकांना आपल्या मुलीच्या लग्नाची खूप काळजी असते आणि ते वेळोवेळी तिला तिच्या फिटनेस आणि सौंदर्याबद्दल अडवत असतात. तू जास्त खाल्ले तर तू लठ्ठ होशील , मग तुमच्याशी कोण लग्न करेल असे म्हटले जाते. तुमच हे वाक्य तुमच्या मुलीला बऱ्याच अंशी निराश करू शकते.