New Alto : नवीन अवतारात मारुती सुझुकीची कार ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या फिचर्स

Ahmednagarlive24 office
Published:

New Alto : देशातील आघाडीची वाहन निर्मिती कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) भारतीय कार बाजारात (Indian Car Market) एकामागून एक नवीन कार त्याचबरोबर कारचा नवीन अवतार लॉन्च (Launch) करत असते.

मारुती सुझुकी लवकरच नेक्स्ट जनरेशन अल्टो (Next Generation Alto) नवीन ग्रिल, हेडलॅम्प आणि बंपर अशा अशा हटके अंदाजात लॉन्च होणार आहे. मारुती सुझुकी आजकाल आपली देशांतर्गत श्रेणी फेसलिफ्टेड एर्टिगा (Ertiga) आणि XL6 च्या रूपाने एकत्रित करत आहे.

कंपनीने अद्ययावत Baleno, New Brezza आणि New-generation Celerio आधीच बाजारात लॉन्च केले आहे. आता ती अल्टोला नव्या रुपात सादर करण्याच्या तयारीत आहे.

नेक्स्ट जनरेशन अल्टो 2022 मारुती सुझुकीच्या हलक्या वजनाच्या HEARTECT प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. S-Presso, Wagon R आणि Celerio सारख्या लोकप्रिय हॅचबॅक या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या आहेत. अल्टोचे नवीन मॉडेल जुन्या मॉडेलपेक्षा मोठे असेल आणि त्याला जास्त जागाही मिळेल.

रिपोर्ट्सनुसार, नवीन अल्टोची रचना नवीन सेलेरियो सारखीच दिसू शकते. नवीन अल्टोच्या आतील भागात अपडेटेड इन्स्ट्रुमेंट कन्सोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स मिळतील.

कंपनी 18 ऑगस्ट रोजी नवीन अल्टो लाँच करू शकते. याच्या फ्रंटला मोठी ग्रिल, नवीन हेडलॅम्प आणि बंपर मिळतील. चांगल्या टेललाइट्ससह, स्पेशल रियर प्रोफाइल आणि नवीन रूफलाइन देखील नवीन अल्टोमध्ये दिसू शकते.

नवीन अल्टोमधील नवीनतम फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात नवीन डॅशबोर्ड, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सपोर्ट, कीलेस एंट्री, पुश बटण स्टार्ट स्टॉप बटण यासह अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये मिळतील. ही सर्व वैशिष्ट्ये सध्याच्या अल्टोमध्ये दिसत नाहीत.

नवीन अल्टोच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 796cc 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन तसेच 1.0 लीटर K10C Dualjet पेट्रोल इंजिन मिळेल. नवीन अल्टो मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe