Steel Price Today : घर बांधण्याची सुवर्णसंधी ! स्टील आणि सिमेंटचे दर कोसळले, जाणून घ्या आजचे दर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Steel Price Today : छोटेसे का होईना घर (Home) असण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र घराच्या साहित्याच्या किंमती वाढल्यामुळे अनेकांना घर बांधणे कठीण झाले होते. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र घर बांधणाऱ्यांसाठी आनांदाची बातमी आहे. स्टील (Steel) आणि सिमेंटचे (Cement) दर घटले आहेत.

घर बांधण्यासाठी लोक वर्षानुवर्षे पैसे जोडत राहतात. महागाईने अशा लोकांच्या स्वप्नांना झटका दिला. जर तुम्ही नुकतेच घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. घर बांधण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्टील, वाळू (sand), सिमेंट, विटा या सामुग्रीच्या किमतीत कमालीची घट झाली आहे.

फक्त स्टील बद्दल बोलायचे झाले तर गेल्या दोन-तीन महिन्यांत त्याची किंमत निम्म्यावर आली आहे. या आठवड्यातही स्टील च्या दरात प्रतिटन 1100 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. याशिवाय सिमेंट, विटा, वाळूचे दरही लक्षणीयरीत्या खाली आले आहेत.

बांधकाम साहित्याच्या किमतीत घसरण

अलीकडच्या काळात बांधकाम साहित्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. कारण देशांतर्गत बाजारपेठेतील किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने स्टीलवरील निर्यात शुल्कात वाढ केली आहे.

परिणामी, देशांतर्गत बाजारपेठेत स्टील उत्पादनांच्या किमती झपाट्याने कमी झाल्या. गगनाला भिडणारी महागाई कमी करण्यासाठी सरकारने डिझेल आणि पेट्रोलवरील करही कमी केला आहे.

यामुळे शिपिंग खर्च कमी झाला, जे जवळजवळ प्रत्येक गोष्टीची किंमत कमी करण्यात उपयुक्त ठरते. त्याचबरोबर पावसाळा सुरू होताच बांधकामाचे काम कमी होऊ लागते, त्यामुळे बांधकाम साहित्याची मागणी आपोआपच कमी होऊ लागते.

यासोबतच रिअल इस्टेट क्षेत्राची बिकट स्थिती हेही यामागचे कारण आहे. या कारणांमुळे विटा, सिमेंट, बार, म्हणजे रॉड, वाळू या वस्तूंची मागणी खालच्या पातळीवर आली.

स्टीलची किंमत

नोव्हेंबर 2021- 70000
डिसेंबर 2021- 75000
जानेवारी 2022- 78000
फेब्रुवारी 2022- 82000
मार्च 2022- 83000
एप्रिल 2022- 78000
मे 2022(सुरू)- 71000
मे 2022 (शेवट)- 62-63000
जून 2022 (सुरू)- 48-50000
जून 2022 (जून 9): 47-48000

भारतातील प्रमुख शहरांमध्ये आता स्टीलच्या किमती

दुर्गापूर (पश्चिम बंगाल): 45,300 44,200
कोलकाता (पश्चिम बंगाल): 45,800 44,700
रायगड (छत्तीसगड): 48,700 48,500
राउरकेला (ओडिशा): 50,000 49,500
नागपूर (महाराष्ट्र): 51,000 50,500
हैदराबाद (तेलंगणा): 52,000 52,000
जयपूर (राजस्थान): 52,200 52,700
भावनगर (गुजरात): 52,700 52,400
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश): 52,900 52,100
गाझियाबाद (उत्तर प्रदेश): ५३,००० ५३,४००
इंदूर (मध्य प्रदेश): 53,500 53,700
गोवा: 53,800 53,800
जालना (महाराष्ट्र): 54,000 53,800
मंडी गोविंदगड (पंजाब): 54,300 53,800
चेन्नई (तामिळनाडू): 55,000 54,000
दिल्ली: 55000- 54700
मुंबई (महाराष्ट्र): 55,200 54,100
कानपूर (उत्तर प्रदेश): 57,000 56,100