नवे संकट : कोरोनाला हरवणाऱ्या तरुणाला हिरव्या बुरशीची लागण

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  कोरोणा दिवसेंदिवस आपले उपद्रवमूल्य दाखवून देत आहे. म्युकरमायकोसिसनंतर आता कोरोणावर मात केलेल्या रुग्णाला हिरव्या बुरशीची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिलीच केस असण्याची शक्यता आहे.

हिरव्या बुरशीचे लागण झालेल्या मध्य प्रदेशातील इंदूरमधील या 34 वर्षीय तरुणाला उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणलं असल्याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (SAIMS) छातीच्या आजार विभागाचे प्रमुख डॉक्टर रवी दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रुग्ण कोरोनामधून बरा झाला होता.

दरम्यान त्याला आपल्याला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याच संशय आला. यामुळे त्याने चाचणी केली असता याउलट फुफ्फुस, रक्तात हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाले. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये असणारा हिरवी बुरशी संसर्गाचा प्रकार इतर रुग्णांच्या तुलनेत वेगळा आहे का यावर संशोधनाची गरज असल्याचं डॉ. दोशी यांनी म्हटलं आहे.

या रुग्णाला दोन महिन्यांपूर्वी करोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फुफ्फुसात १०० टक्के कोरोना संसर्ग झाला असल्याने जवळपास एक महिना त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं होतं.

पण करोनामधून बरं झाल्यानंतर त्यांच्या नाकातून रक्त वाहत होतं तसंच खूप ताप येत होता. वजन कमी झाल्याने त्यांना अशक्तपणाही आला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान रुग्णाला मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News