Maruti EV Car : कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या कारमुळे मारुती सुझुकीची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. कंपनी सतत आपल्या शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. फीचर्स आणि कमी किमतीमुळे कंपनी इतर कंपन्यांना कडवी टक्कर देताना आपण पाहतच असतो.
अशातच इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहक इलेक्ट्रिक कारकडे वळू लागले आहेत. त्यामुळे कंपनीने आता आपली नवीन EV कार मार्केटमध्ये आणली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ती 550 KM धावते.या कारची तुम्हाला किती पैसे मोजावे लागणार पहा.
SUV काही सेकंदात वेगाने धावते
मारुतीने या नेक्स्ट जनरेशन कारमध्ये प्रत्येक आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला असून नुकतेच या कारचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. कारमध्ये शक्तिशाली 60kWh बॅटरी पॅक दिला आहे. जे उच्च टॉर्क निर्माण करते. त्यामुळे काही सेकंदात 100 चा वेग पकडण्याची क्षमता या कारमध्ये आहे.
पहा फीचर्स
मारुतीच्या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये फ्लश डोअर हँडल दिले आहेत. त्याचा आकार एरोडायनॅमिक असून जो राईडमध्ये नियंत्रित आणि पूर्णपणे गुळगुळीत अनुभव देईल. याला एरो-ऑप्टिमाइज्ड व्हील मिळतात जे याला स्पोर्टी लुक देत आहेत.
हे सर्व-इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म केबिन स्पेस, लांब व्हीलबेस आणि लहान ओव्हरहॅंग कार आहे.कंपनी याला ड्युअल मोटर आणि 4×4 ड्राइव्हट्रेन बनवण्याचा विचार करत असून जर असे झाले तर, ऑफ-रोडिंग आणि कॅम्पिंगसाठी ही एक मजबूत कार असणार आहे. इतकेच नाही तर या फीचर्ससह ही ईव्ही सेगमेंटमध्ये अशी कार असेल की ती THAR ला टक्कर देईल.
आता मिळणार नेक्स्ट जनरेशन लुक आणि बॉक्सी डिझाइन
मारुती eVX ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही असून जी खडबडीत रस्त्यांसाठी योग्य आहे. याला बॉक्सी डिझाइनमध्ये पुढील पिढीचा लुक कंपनीने दिला आहे. सध्या कंपनीने भारतात लॉन्चची तारीख आणि किंमत जाहीर केलेली नसली तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार 2025 पर्यंत मार्केटमध्ये 25 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध होऊ शकते.