Breaking : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय उलथापालथ झालेली सर्वांनीच पहिली आहे. शिवसेनेतील एकही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन भाजपसोबत युती केली आणि राज्यात सरकार स्थापन केले. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळले.
राज्यात पुन्हा एकदा राजकीय गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर येणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रकाश आंबेडकरांनी युतीचा प्रस्ताव देखील दिला आहे.
मात्र शिवसेनेने युतीबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यातच आता एक कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार असल्याने या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
प्रबोधन डॉट कॉम या संकेतस्थळाचे २० नोव्हेंबरला शिवाजी मंदिरामध्ये लोकर्पण होणार आहे. हे लोकार्पण प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. हे दोन्ही नेते या कार्यक्रमात काय बोलणार, तसेच युतीबाबत काही खुलासा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटाने शिवसेनेतून काढता पाय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे तसेच उद्धव ठाकरे यांना फोन देखील केला असल्याची माहिती मिळत आहे.
प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले, निवडणूक आल्यावर राजकीय समीकरणे घडतील. इलेक्शन नाही तोपर्यंत असेच चालेल. सध्या तरी युती आणि आघाडी करावी या संदर्भात कुणालाच उत्सुकता नाहीये.
मी गेली दहा दिवस मुंबईच्या बाहेर आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आहे. माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.