क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये नवा विक्रम; बिटकॉइनचे किंमत ऐकून व्हाल थक्क

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- जगभरातील अर्थव्यवस्थेत क्रिप्टोकरन्सी हळूहळू स्थान मिळवू लागले आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रतिदिन नवनव्या करन्सीची भर पडत आहे.

क्रिप्टोकरन्सीतील सर्वात वजनदार मानल्या जाणाऱ्या Bitcoin नंतर आता आणखी एक करन्सी नवा विक्रम करताना दिसत आहे. Ether असे या करन्सीचे नाव आहे.

Ethereum ब्लॉकचेन वर आधारीत या कॉईनने एशियायी बाजारात मार्केट वैल्युएशन नुसार दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी होण्याचा बहुमान मिळवाला आहे.

Ether एशियाई बाजारात तब्बल 4 हजार 400 डॉलर किमतीवर पोहोचला. भारती बाजारात Ether ची किंमत पाहायचे तर Ether किमतीत 8.76% तेजी पाहायला मिळत होती.

त्याची किंमत 3,46,15627 इतकी होती. क्रिप्टोकरन्सी बाजारात पाठिमागील काही आठवड्यांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. Bitcoin 20 ऑक्टोबरला पहिल्यांदा 67,000 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत 50 लाख रुपयांपेक्षा अधिक किंतीवर पोहोचला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe