नवा ट्विस्ट, शिवसेनेचा आता संभाजीराजेंना असा अल्टिमेटम

Published on -

Maharashtra news : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेना परस्कृत करण्यास तयार असल्याच्या बातम्या येत असातानाच या राजकारणाला एक नवा ट्विस्ट आला आहे.

शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेना प्रवेशाची अट कायम ठेवली असून यासाठी उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत मातोश्रीवर यावे, असा निरोप त्यांना देण्यात आला आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना आज दुपारी हा निरोप पाठविला.

मंत्री उदय सामंत, खासदार अनिल देसाई आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी ओबेराय हॉटेलमध्ये जाऊन, ठाकरेंचा निरोप संभाजीराजेंना दिला. कोणत्याही पक्षात प्रवेश न करता अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम असलेले संभाजीराजे याला कसा प्रतिसाद देतात, हे अद्याप समोर आले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe