Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले. मात्र, त्यांनी सादर केलेले चिन्हांची तिन्ही पर्याय नाकारण्यात आले होते.
त्यांना आज सकाळपर्यंत नवीन तीन पर्याय सूचविण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासाठी तळपता सूर्य,

ढाल तलवार व पिंपळाचे झाड ही तीन चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगकडे सादर केली. आता यापैकी त्यांना कोणते चिन्ह दिले जाणार, यावर निवडणूक आयोग लवकरच निर्णय देणार आहे.