अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- तुम्हाला जाणवणारी थंडी कमी होणार आहे. कारण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होऊन काही भागात पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने सोमवारी वर्तविली.(Untimely rain)
कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यावर २८ डिसेंबरपासून पुन्हा पावसाचे सावट आहे. यामुळे ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पुन्हा एकदा बळीराज्याची चिंता वाढली आहे.

दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस, तर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
कोकण विभागात मात्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात २८ आणि २९ डिसेंबर रोजी काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२८ ते २९ डिसेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान राज्यात २८ डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा,
गोंदिया आणि २९ डिसेंबर रोजी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे पावसाची शक्यता आहे. तसेच धुळे, नाशिक, जळगाव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर या जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम