Financial Deadlines : येत्या सात दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच जल्लोषात तयारी सुरू झाली आहे.
वर्ष 2024 सुरू झाल्यानंतर म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच काही नवीन नियमांची सुरुवातही होणार आहे. शासनाच्या माध्यमातून काही नवीन नियम तयार करण्यात आले आहेत.
या नवीन नियमांची अंमलबजावणी नवीन वर्षापासून होणार आहे. शिवाय काही महत्त्वाच्या कामांची मुदत देखील नवीन वर्ष सुरू होण्याबरोबरच संपणार आहे. यामुळे ही महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहेत.
पैशांशी संबंधित ही कामे 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करावी लागणार आहेत. जर तुम्ही ही कामे नियोजित वेळेत पूर्ण केली नाहीत तर तुमच्या अडचणीत वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत,
आता आपण 31 डिसेंबरपर्यंत कोण-कोणती महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ही कामे करावी लागणार
डिमॅट अकाउंटला नॉमिनी जोडा : भारतात शेअर बाजारात इन्वेस्ट करणाऱ्या लोकांना डिमॅट अकाउंट ओपन करावे लागते. जर तुम्हीही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुमचे डिमॅट अकाउंट असेलच.
दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या आधीच तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाउंटसंदर्भात एक महत्त्वाचे काम करायचे आहे. तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाउंटला नॉमिनी ऍड करायचे आहेत. जर तुम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुमच्या डिमॅट अकाउंट आम्ही ऍड केले नाही तर तुमचे डिमॅट अकाउंट फ्रीज होऊ शकते.
त्यामुळे तुम्हाला हे काम येत्या सात दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला शेअर बाजारात पैसा लावता येणार नाही. तुम्ही जर हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला शेअर बाजारात स्टॉकची खरेदी आणि विक्री करता येणार नाही.
म्युच्युअल फंड साठी नॉमिनी जोडा :
अनेक जण शेअर बाजारासह म्युच्युअल फंड मध्ये देखील गुंतवणूक करतात. ज्या लोकांना थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखीमीचे वाटते असे लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. जर तुम्ही ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 31 डिसेंबर पूर्वी नॉमिनी लावणे अनिवार्य आहे.
जर तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये पैसा जमा करणे आणि काढणे अशक्य होणार आहे. आयकर रिटर्न फाईल करा : नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच आयकर दात्यांसाठी देखील एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे.
जर तुम्ही टॅक्सपेयर असाल आणि अजून आयकर रिटर्न फाईल केलेले नसेल तर तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत हे काम करावे लागणार. खरेतर सुरुवातीला यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत मुदत होती. मात्र नंतर 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच आता येत्या सात दिवसात ही मुदत संपणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हे काम पूर्ण करायचे आहे.
बँक लॉकर एग्रीमेंट :
बँक ग्राहकांना देखील एक विशेष काम 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करायचे आहे. जर तुम्ही बँक लॉकर घेतलेले असेल तर तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत नवीन लॉकर एग्रीमेंट करावे लागणार आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला तुमचे बँक लॉकर खाली करावे लागू शकते.
UPI आयडी होणार बंद :
जर तुम्ही फोन पे गुगल पे पेटीएम यांसारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन चा वापर करत असाल तर तुम्हाला देखील नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. जर तुमच्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनच्या यूपीआय आयडीवरुन गेल्या एका वर्षात कोणतेच ट्रांजेक्शन झालेले नसेल तर अशा युपीआय आयडी बंद केल्या जाणार आहेत.
त्यामुळे जर तुम्हीही गेल्या एका वर्षाच्या काळात कोणतेच ट्रांजेक्शन केलेले नसेल तर तुमची देखील आयडी बंद होऊ शकते. यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनची युपीआय आयडी सुरू ठेवण्यासाठी ट्रांजेक्शन करावे लागणार आहे.