Nitesh Rane : बाई कोणाला पाडते ते 2 मार्चला बघू! नितेश राणे अजित पवारांवर बरसले…

Nitesh Rane : पुण्यातील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. असे असताना आता राणेपुत्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले म्हणाले चुकीची माहिती देऊ नका आता उद्या पुण्यात बाई कोणाला पाडते ते समजेल तेव्हा बघू असे म्हणत त्यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.

नारायण राणेंना एका बाईने निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली होती. यामुळे नितेश राणे आक्रमक झाले आहेत. अधिवेशनात बोलताना त्यांनी यामुळे अजित पवारांवर जोरदार टीका केली.

अजित पवारांना महिलांचा अपमान करायचा आहे का? असेही ते म्हणाले. ते अधिवेशनात बोलत होते. दरम्यान, शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले लोक पुढे राजकारणात यशस्वी झाले नाहीत. हे सांगताना अजित पवार यांनी काही उदाहरणं दिली होती.

यामध्ये छगन भुजबळ शिवसेनेतून १९ लोकांसह बाहेर पडले होते. त्यानंतर भुजबळ यांच्यासकट सगळं लोक पराभूत झाले. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. त्यांच्या सोबतचे पक्षातून बाहेर पडलेले सर्व आमदार पडले.

स्वत: नारायण राणे दोनदा पडले. एकदा कोकणात, दुसऱ्यांदा मुंबईतील उभे होते, तिथेही पडले. तिथे तर नारायण राणे यांना एका बाईने पाडलं, असे अजित पवार म्हणाले होते. यामुळे हा वाद सुरू झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe