अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra New :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा आता प्रचंड वाढला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर एकाने चप्पल भिरकावल्यानंतर आता या प्रकरणावर टीका होऊ लागली आहे.
यातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील शिवसेनेला टार्गेट केले आहे. ‘खरं म्हटले तर आपण काही लोकं हिंदुह्रदयसम्राट असल्याचे बॅनरसहित फोटो लावतात.
पण तुम्ही माझी भावना विचारली तर खरा हिंदूह्रदयसम्राट ही पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं माझं म्हणणं आहे, असे नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे यांनी असे प्रश्न उपस्थित करुन हिंदुह्रदयसम्राट यावरुन आता शिवसेनेला त्यांनी छेडले आहे. त्यामुळे हिंदुह्रदयसम्राटचा वाद विकोपाला जाणार का हे आता येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
हिंदुह्रदयसम्राट ही पदवी देवेंद्र फडणवीस यांना का द्यायची याबद्दल त्यांनी त्यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी राष्ट्र, राज्य वाचवल्याचे सांगत आताच्या काळात तेच खरे हिंदुह्रदयसम्राट असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
मालिकांवर टीकास्त्र नवाब मलिक यांच्यावर आरोप करताना त्यांनी त्यांचा आणि दाऊदचा थेट संबंध असल्याचे सांगत आमदार, मंत्री यांचे संबंध जर अंडरवर्ल्डशी असतील तर आपल्या आयुष्याची गॅरेंटी कोण देणार तुम्ही सांगा मला? असा सवालही त्यांनी बोलताना उपस्थित केला.