नाशिक : शिवसेना (Shivsena) नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहे. गेली काही दिवस झाले हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आलं होता मात्र आता १५ जून रोजी हा दौरा होणार आहे.
याच दौऱ्यावरून भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लागलेला आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेवरही जहरी टीका केली आहे. लहान मुलांना अयोध्यात परवानगी आहे का? असा खोचक टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही पुन्हा एकदा तोफ डागली आहे. तसेच कडवट शिवसैनिक संजय पवार आहेत संजय राऊत नाही, संजय राऊत (Sanjay Raut) बाहेरून आले आहेत,
त्यांचा काय संबध, संजय राऊत निर्लज्ज आहेक, त्यांनी मा साहेब आणि बाळासाहेब यांच्यावर लेख लिहिला होता त्यांच्यात वाद आहे असा, त्याला शिवसेनेचे आमदार मतं देतीला का? असा सवालही राणे यांनी यावेळी केला आहे.
तर सेफ मत संजय पवार यांना द्यावी संजय राऊतांना उर्वरित मत द्यावी, तसेच संजय राऊतांना लीलावतीला पाठविण्याची वेळ आली आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधीच शिवसेना नेत्यांनी अयोध्येत जाऊन पाहणी केली आहे. आदित्य ठाकरे हे शरयू नदीवर महाआरती करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच शिवसेना नेत्यांकडून आमचा हा दौरा राजकीय नाही हा आमचा धार्मिक दौरा आहे असे सांगण्यात येत आहे.