अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन करण्याचा विचार नाही, मात्र ‘कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल.
नागरिकांनी परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेत नियमांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे, जिल्हा माहीती अधिकारी दीपक चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी कोरोना संसर्गाची सद्यस्थिती विषद केली. तसेच संभाव्य परिस्थीती लक्षात अगामी काळासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यापुढील काळात बाधितांना कोव्हीड सेंटरमध्ये बंधनकारक राहाणार आहे.
एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीतही दक्षतेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद सीईओ क्षीरसागर यांच्यासमवेत जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांचा दौरा करीत आढावा घेतला आहे.
मास्क, सॅनेटायझरचा वापर करणे, गर्दी टाळणे या महत्वाच्या बाबींचा नागरीकांनी जागरुकतेने अंगीकार केल्यास लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|