Aadhar Card : आजच्या काळात आधार कार्ड (Aadhar Card) हे तुमच्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज (document) बनले आहे.
सरकारी योजनांचा (government schemes) लाभ घ्यायचा असेल किंवा बँकेशी (bank) संबंधित कोणतेही काम असो, जवळपास सर्वत्र आधार कार्डची आवश्यकता असतेच. प्रत्येक क्षेत्रात आता आधारची गरज वाढत आहे मात्र त्यासंबंधित समस्या सोडवण्यासाठी तितके आधार सेवा केंद्र (Aadhaar Seva Kendra) उपलब्ध नाही.
आता ही बाब लक्षात घेऊन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक मोठी योजना आखली आहे. याअंतर्गत देशातील (country) मोठ्या शहरांमध्ये शेकडो केंद्रे (centers) उघडली जाणार आहेत. 53 शहरांमध्ये 114 केंद्रे उघडली जाणार आहेत UIDAI ने देशातील 53 प्रमुख शहरांमध्ये एकूण 114 आधार सेवा केंद्रे उघडण्याची योजना तयार केली आहे.
ही आधार सेवा केंद्रे देशातील सर्व मेट्रो शहरांमध्ये, सर्व राज्यांच्या राजधानीत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उघडली जातील. सध्या देशात कार्यरत असलेल्या आधार सेवा केंद्रांबद्दल बोलायचे झाले तर त्यांची एकूण संख्या 88 आहे, जी वाढवण्याची तयारी केली आहे.
तथापि, सेवा केंद्रांव्यतिरिक्त, देशभरात 35,000 हून अधिक आधार केंद्रे आहेत, जी बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारे चालवत आहेत.
केंद्रे रविवारीही काम करणार
नवीन आधार कार्ड बनवायचे असो किंवा त्यात कोणतेही बदल करायचे असोत, तुम्ही या आधार सेवा केंद्रांद्वारे आठवड्यातील सातही दिवस सेवा घेऊ शकता.
म्हणजेच साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही ते सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत सुरळीतपणे उघडतात. या आधार सेवा केंद्रांमध्ये वृद्ध आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जातात. याद्वारे तुम्ही बायोमेट्रिकशी संबंधित काम किंवा आधारमध्ये नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी सहज अपडेट करू शकता.
आधार अपडेट फी
आधार नोंदणी – मोफत, बायोमेट्रिक अपडेट – 100 रुपये, नाव, पत्ता, जन्मतारीख – 50 रुपये, मुलांचे बायोमेट्रिक – मोफत
अधिक शुल्क आकारल्यास येथे तक्रार करा
जर तुम्ही एखाद्या आधार केंद्रावर अपडेटसाठी गेलात आणि तेथे निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रकमेची मागणी होत असेल, तर अशा परिस्थितीत तुमच्याकडे संबंधितांकडे तक्रार करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तुम्ही uidai.gov.in वर मेलद्वारे किंवा टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.