संपामुळे पगार नाही, तुला पैसे कुठून देऊ… वडिलांचे शब्द ऐकून मुलाने घेतला धक्कादायक निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  राज्य शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अद्यापही अनेक ठिकाणी एसटीची चाके थांबलेली आहे.

यातच एक धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी व्हायचं आहे असं सांगून वडिलांनी घर सोडले अन् इकडे मुलानं आईची साडी गळ्याला गुंडाळून आत्महत्या केली.

सोलापूरमधल्य कोंडी इथं हा दुर्दैवी प्रकार घडला असून अमर तुकाराम माळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अवघ्या २० वर्षांचा होता. अधिक माहिती अशी, अमर माळीचं दयानंद महाविद्यालयात 12 वीपर्यंत शिक्षण झालं आहे. बुधवारी सकाळी त्याने वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली.

पण वडिल तुकाराम माळी म्हणाले, संपामुळे दोन तीन महिने पगार नाही, काम बंद आहे तुला पैसे कुठून देऊ असं वडिलांनी हताश होऊन सांगितलं. अमरशी बोलणं झाल्यावर वडिल तुकाराम माळी आंदोलन सुर असलेल्या ठिकाणी निघून गेले.

त्यानंतर अमर न जेवताच स्वत:च्या खोलीत गेला. बराच वेळ झाला तरी अमर बाहेर न आल्याने आईने आवाज दिला. पण खोलीतून कोणताही प्रतिसाद आला आहे. अमरच्या मोठ्या भावाने शेवटी मोठ्या भावाने खिडकीतून आत पाहिलं असता अमरने आईच्या साडीने गळफास घेतला होता.

भावाने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि अमरला खाली उतरवलं. त्याला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच अमरचा मृत्यू झाला होता. संपकरी वडिलांनी हे समजताच त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe