वाहनाची इतर कार्यक्षेत्रात विक्री केल्यास एनओसीची आवश्यकता नाही

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यात इतर इतर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहनाची विक्री केल्यास ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) आवश्यकता नसल्याचे

परिपत्रक यापुर्वीच राज्याच्या परिवहन आयुक्तांनी जारी केले आहे. तसेच या कार्यपध्दती द्वारेच संपुर्ण महाराष्ट्रभर कामकाज चालू आहे.

त्यामुळे एनओसी पूर्ववत करण्यात आल्यासंदर्भात सोशल मीडिया आणि काही वर्तमानपत्रात आलेले वृत्त निराधार आणि चुकीचे आहे, असा खुलासा अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केला आहे.

याप्रकारे चुकीचे संदेश प्रसारित करुन जनमानसांत चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया

तसेच काही वर्तमानपत्रात इतर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहन विक्री केल्यास एनओसी पुन्हा लागू करण्यात येणार असल्याचे वृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पाटील यांच्या नावाचा संदर्भ देऊन प्रसारित करण्यात आले होते.

मात्र, असा कोणताही निर्णय झालेला नाही. सोशल मीडियावरील वृत्त निराधार आणि चुकीचे असून आता अशा प्रकारे वाहन विक्री केल्यास

एनओसीची आवश्यकता नसल्याचे परिपत्रक परिवहन आयुक्तांनी यापूर्वीच जारी केले आहे. त्याप्रमाणेच काम सुरु असल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe