Nokia King Max 5G : आयफोनलाही टक्कर देतो नोकियाचा ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Published on -

Nokia King Max 5G : नोकिया ही मार्केटमधील लोकप्रिय टेक कंपनी आहे. या स्मार्टफोनचा वापरकर्त्यांच्या मनावर आणि मार्केटमध्ये दबदबा आहे. कंपनीने कमी कालावधीत आपले स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते.

अशातच आता आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. लवकरच कंपनी आपला नवीन स्मार्टफोन Nokia King Max 5G हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा फोन आयफोनला टक्कर देईल.

दिग्ग्ज टेक कंपनी नोकियाच्या या फोनचे नाव Nokia King Max 5G आहे. त्यात एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनची रॅम क्वालिटी शानदार असून बॅटरी बॅकअप उत्तम आहे. इतकेच नाही तर या स्मार्टफोनमध्ये मजबूत दर्जाचा कॅमेरा उपलब्ध आहे. 16 GB रॅम, 108MP प्रायमरी कॅमेरा आणि 8000mAh ची बॅटरी यात उपलब्ध आहे.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीने यात 1440 X 3200 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.9-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले उपलब्ध करून दिला आहे. हा डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास दिला आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास यात स्नॅपड्रॅगन 898 प्लस प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

या उत्कृष्ट स्मार्टफोनच्या रॅम आणि अंतर्गत स्टोरेजबद्दल विचार केला तर हा 8/12/16 जीबी रॅम आणि 128/256/512 जीबी अंतर्गत स्टोरेज पर्यायांसह उपलब्ध आहे. तसेच तुम्ही ते नंतर मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता.

असा असणार कॅमेरा

Nokia King Max 5G मधील कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास या फोनच्या मागे 4 कॅमेरा सेटअप दिले आहे, ज्यात 108MP मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स आहे. 32 MP + 16 MP + 5 MP असे तीन इतर कॅमेरे दिले आहेत. त्याशिवाय सेल्फीसाठी 64-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा लेन्स दिली आहे.

बॅटरी पॉवर

कंपनीच्या या फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी जलद चार्जिंग सपोर्टसह 8000 mAh ची मजबूत बॅटरी दिली आहे. याचा बॅटरी बॅकअप खूप चांगला असून कंपनीने यासोबतच कनेक्टिव्हिटीसाठी 5G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPRS आणि अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत.

किती असणार या स्मार्टफोनची किंमत

या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला भारतीय बाजारात 44000 रुपयांच्या अंदाजे किंमतीत उपलब्ध होऊ शकतो. परंतु,त्याची खरी किंमत लॉन्च झाल्यानंतर कळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe