Cashback offer : तुमच्यापैकी अनेकजण गुगल पे आणि फोन पे सारखी पेमेंट ॲप वापरत असतील. या ॲपमुळे आर्थिक व्यवहार खूप सोपे झाले आहेत. परंतु, हे ॲप कॅशबॅक देत नाहीत.
मात्र मार्केटमध्ये असलेले भारत पे हे अॅप तुम्हाला कॅशबॅक देत आहे. या ॲपमुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1000 रुपये कमावता येतील.हे पैसे म्हणजे कॅशबॅक कसा मिळवायचा ते जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा.

सगळ्यात अगोदर करा हे काम
- कॅशबॅक मिळवायचा असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला ॲपमधील “contribute money” या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
- बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे.
- त्यानंतर “Link Now” वर क्लिक करून तुम्हाला तेथील ड्रॉप डाउन मेनूवर जावे लागेल. त्यानंतर तुमचे बँक खाते निवडा.
- आधार क्रमांक टाकून त्याची ओटीपीच्या मदतीने पडताळणी करा.
- अशा प्रकारे आधार केवायसी पूर्ण होईल, त्यानंतर सेल्फी घेऊन तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर आलेल्या तुम्हाला सर्व नियम आणि अटी मान्य कराव्या लागतील, जर तुम्ही ही संमती दिली तरच तुमचे खाते सक्रिय केले जाणार आहे.
- आता तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा करा आणि तुम्हाला त्यावर 12% पर्यंत व्याज मिळू शकेल.
तर मिळतील पैसे
हे ॲप आपल्या ग्राहकांना खूप चांगल्या ऑफर देत आहे. त्यामुळे याचा फायदा घेऊन गुंतवणूक करू शकता. सर्वात विशेष म्हणजे बाजाराच्या तुलनेत तुम्हाला येथे चांगले व्याज दिले मिळत आहे.
हे व्याज तुम्हाला दररोज दिले जाते. यामुळे तुम्हाला जास्त कमाई करण्याची संधी मिळते. जर तुम्ही या खात्यात 1 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दररोज सुमारे 32 रुपये व्याज दिले जाईल. त्यामुळे तुम्ही एका महिन्यात 1000 रुपये कमवू शकता.