SUV Cars : मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीकडे मोठा ग्राहकवर्ग आहे. त्यांचयसाठी कंपनी सतत शानदार कार्स लाँच करत असते. फीचर्समुळे ही कंपनी सतत इतर कंपन्यांना टक्कर देते. नुकतीच कंपनीची मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही कार लाँच झाली आहे.
कंपनीची ही 5 सीटर SUV आहे. बाजारात लाँच झाल्यापासून तिला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. ग्राहक आता Hyundai Creta, Kia Seltos नाही तर ग्रँड विटारा खरेदी करू लागले आहेत. कारच्या बुकिंगसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
बुकिंग झाले 1.20 लाखांच्या पार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारचे बुकिंग 1.20 लाखांच्या वर पोहोचले आहे. परंतु,या डॅशिंग एसयूव्हीसाठी अनेक महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. असे असतानाही खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये लोकांच्या रांगा लागल्या आहेत. कंपनीच्या या नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटाराची किंमत 10.45 लाख रुपयांपासून सुरू होते ती एक्स-शोरूम 19.65 लाख रुपयांपर्यंत जाते. आकर्षक लुक असणारी ही 5 सीटर एसयूव्ही आहे. जी हायब्रिड 1.5-लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे.
मायलेज आहे 28 किलोमीटर प्रति लिटर
कारच्या समोरील बाजूस क्रोम सुशोभित ग्रिल कारचे आकर्षण वाढवत आहे. इतकेच नाही तर कंपनीने या ग्रिलमध्ये एलईडी डीआरएल दिले आहेत. टायर 17-इंचाच्या अलॉय व्हील्समध्ये आणि कनेक्ट केलेल्या एलईडी टेल लॅम्पमध्ये देण्यात आले आहेत. कंपनीने आपली आगामी कार सहा मोनो-टोन रंग आणि तीन ड्युअल-टोन रंगांत बाजारात दाखल केली आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये 28 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते असा दावा कंपनी करत आहे.
शिवाय त्यात सीएनजी व्हर्जनही उपलब्ध आहे. ही SUV 91 bhp पॉवर आणि 122 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची लांबी 4345 मिमी, रुंदी 1795 मिमी, उंची 1645 मिमी, व्हीलबेस 2600 मिमी, ग्राउंड क्लिअरन्स 210 मिमी, बूट स्पेस 260-310 लिटर आणि इंधन टाकीची क्षमता 45 लिटर इतकी आहे.
आहेत ही फीचर्स
- वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay
- 9.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
- पॅनोरामिक सनरूफ
- वायरलेस स्मार्टफोन चार्जर
- डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
- हवेशीर समोरच्या जागा
- 360 डिग्री पार्किंग कॅमेरा
- सहा एअरबॅग्ज, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट
- डोंगर उतार नियंत्रण