Electric car : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे अनेकजण इंधनाच्या कार खरेदी न करता इलेक्ट्रिक कार खरेदी करू लागले आहेत. अनेक दिग्ग्ज कंपन्या आपल्या नवनवीन आणि शानदार फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच करू लागल्या आहेत.
आगामी काळात इलेक्ट्रिक कारची संख्या वाढू शकते. इलेक्ट्रिक कारचे खूप फायदे आहेत. तसेच या कारचे काही तोटेही आहेत. त्यामुळे जर तुम्ही कार खरेदी करणार असाल तर त्यापूर्वी इलेक्ट्रिक कारचे तोटे जाणून घ्या. नाहीतर नंतर त्याचे नुकसान सहन करावे लागेल.

मोजावे लागतात जास्त पैसे
सगळ्यात अगोदर जर तिची आपण किंमत पहिली तर इलेक्ट्रिक कारच्या किमती खूप जास्त आहेत. तसेच या कार जास्त अंतर कापू शकत नाही. त्यामुळे तिचे पैसे वसूल होण्यासाठी तुम्हाला बरीच वर्षे लागू शकतात. ईव्ही चालवताना इंधनावर बचत झालेल्या पैशांचा दावा करण्यापूर्वी एखाद्याला सुमारे 1.40 लाख किमी चालवावी लागू शकते. त्यानंतरच त्याबद्दल आपण अचूकपणे सांगू शकतो. त्यामुळे कोणत्या EV डीलमध्ये तुम्हाला कमी खर्च येईल हे सांगता येत आहे.
कमी पर्याय
समजा जर तुमचे बजेट 10 लाख असेल तर इलेक्ट्रिक कारमध्ये तुम्हाला फक्त Tata Tiago EV आणि Citroen C3 इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता . जर तुम्हाला इंधन-इंजिन असलेली कार हवी असल्यास तुमच्याकडे हॅचबॅक, सब-कॉम्पॅक्ट सेडान, क्रॉसओवर, मायक्रो एसयूव्ही सारखे पर्याय तुमच्याकडे आहे. सध्या, भारतातील प्रत्येक बॉडी सेगमेंटमध्ये ईव्हीची निवड मर्यादित असून आता येत्या काळात हे पर्याय नक्कीच वाढू शकतील.
बॅटरी
नियम आणि अटींनुसार, वापरकर्त्यांसाठी बहुतेक EV उत्पादक सध्या त्यांच्या EV बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी देत असून या बॅटरीची किंमत सर्वात जास्त आहे. बॅटरीची दुरुस्ती किंवा बदलण्यासाठी खूप मोजावे लागतात. जर तुम्ही ही कार खरेदी केली तर, बॅटरी पुन्हा बदलण्याचा खर्च तुमच्या बजेटच्या बाहेर असण्याची शक्यता आहे.
सेकंड हँड कार
इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत ईव्ही बाजारात नवीन असून पूर्व-मालकीच्या बाजारपेठेत ईव्ही प्रत्यक्षात कसे कार्य करेल आणि ते कोणत्या आधारावर विकले जाईल हे अजूनही कोणालाही माहित नाही. इलेक्ट्रिक कार हा एक उत्तम पर्याय असला तरी 5-10 वर्षे कार चालवल्यानंतर त्याची किंमत पुढे काय असू शकते हे सांगता येत नाही.