Sealand | जगात विविध देश आपल्या आकार, संस्कृती आणि लोकसंख्येनुसार प्रसिद्ध आहेत. काही देश लोकसंख्येच्या घनतेसाठी ओळखले जातात, तर काही आपल्या विशालतेसाठी. पण तुम्हाला हे माहिती आहे का की जगात असा एक देश आहे जिथे केवळ 27 लोक राहतात? हो, हे खरं आहे! या देशाचं नाव आहे प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलँड (Principality of Sealand), आणि तो जगातील सर्वात लहान देश मानला जातो.
सीलँड- सर्वात छोटा देश
सीलँड हा देश इंग्लंडमधील सफोक (Suffolk) च्या किनाऱ्यापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर समुद्रात स्थित आहे. तो एक उध्वस्त समुद्री किल्ला आहे, ज्याचा उपयोग दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटनने जर्मनीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी केला होता.

युद्ध संपल्यानंतर ही जागा रिकामी पडली आणि 1967 मध्ये रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने या ठिकाणाला स्वतंत्र देश घोषित केलं. त्याने स्वतःला सीलँडचा राजकुमार घोषित केलं आणि नंतर त्याचा मुलगा मायकेल बेट्स याने हा कारभार चालवायला सुरुवात केली.
क्षेत्रफळ केवळ 250 मीटर
सीलँडमध्ये कोणतेही घरे नाहीत, बाजारपेठ नाही, ना पायाभूत सुविधा. तरीही, या देशाला स्वतःचा ध्वज, स्वतःचं चलन आणि लष्कर आहे. येथे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाही, तर राजा आणि राणी या देशाचा कारभार पाहतात. या सूक्ष्म राष्ट्राचं क्षेत्रफळ केवळ 250 मीटर म्हणजे सुमारे एक चतुर्थांश किलोमीटर इतकं आहे. त्यामुळेच ते जगातील सर्वात लहान देश ठरतो.
सीलँडला आंतरराष्ट्रीय मान्यता नसली तरी ते एक वेगळं आणि अनोखं उदाहरण आहे. येथे राहणारे लोक आपल्या देशावर प्रेम करतात आणि राजा-राणीच्या आदेशांप्रमाणे जीवन जगतात. आजही अनेक लोकांना या देशाबद्दल माहिती नाही, पण ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हे एक आश्चर्यच आहे.