लक्ष द्या… आजपासून आठच्या आत घरात ; नाहीतर चोप मिळणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- राज्यात मोठ्या प्रमाणात कोविड बाधित समोर येवू लागल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेत आजपासून राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी निर्बंध घातले आहेत.

हा आदेश पुढील 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात लागू राहणार आहे. या नियमांमुळे आजपासून प्रत्येकाला आठच्या आत घरात यावे लागणार आहे.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर जारी करण्यात आलेल्या या नियमांचे सर्वांनी पालन करावे, अन्यथा पोलिसांकडून होणार्‍या कारवाईचा सामना करावा लागणार आहे.

नवीन गाईडलाईन्स नुसार आज रात्री आठनंतर जिल्ह्यात कोणतीही दुकाने, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट अथवा सार्वजनिक ठिकाणे खुली राहणार नाहीत,

यातून केवळ औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत. या कालावधीत पाच अथवा त्यापेक्षा अधिक संख्येने कोणी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही शहर पोलिसांनी दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनो आजपासून आठच्या आंत घरात! या सूत्राचे सर्वांनी पालन करावे, अन्यथा पोलिसांकडून होणार्‍या कारवाईचा सामना करावा लागेल.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक झाला असून दररोज मोठ्या संख्येने रुग्णसमोर येत असल्याने जिल्ह्यातील अहमदनगर शहर, राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील कोविड स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नव्याने लागू केलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमली बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पोलीस व महसुल प्रशासनाला बजावले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe