Old Pension : देशातील काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. तसेच काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन प्रणाली लागू करण्याची योजना आखली जात आहे.
अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक अधिसूचना जारी केली आहे. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी माहिती दिली आहे.
चिंतेची बाब
RBI ने राज्यांच्या वित्तविषयक वार्षिक अहवाल जारी केला असून ज्यामध्ये असे म्हटले आहे की, कोरोना काळापासून राज्यांच्या स्थितीत अनेक बदल झाले आहेत, त्यामुळे येणारा काळ हा खूप चिंताजनक असल्याने OPS लागू करणाऱ्या राज्यांसाठी ही चिंतेची बाब आहे असे म्हटले आहे.
हिमाचल हे चौथे राज्य
आरबीआयचे हे विधान अशा वेळी जारी केले आहे जेव्हा अनेक राज्य सरकार जुनी पेन्शन प्रणाली लागू करत आहेत. तसेच अनेक राज्ये ते पुनर्संचयित करण्याचा विचारात आहेत. जानेवारी महिन्यात हिमाचलच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही OPS लागू करण्यात आली आहे.
या राज्यात लागू झाली पेन्शन
छत्तीसगड सरकार, राजस्थान सरकार, पंजाब सरकारने जुनी पेन्शन प्रणाली लागू केली आहे. अशातच आता हिमाचल सरकारनेही OPS लागू केली आहे.
फायदे
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेवटच्या काढलेल्या पगाराच्या आधारे केले जाते. महागाईचा दर वाढला की डीएही वाढतो. सरकार जेव्हा नवीन वेतन आयोग लागू करते तेव्हाही पेन्शन वाढवत असते.
यांना मिळणार लाभ
नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय निमलष्करी दलांना (CAPF) जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याचा निर्णय दिला आहे. कोर्टाने सांगितले आहे की हे एक सशस्त्र दल आहे, त्यामुळे या लोकांना OPS चा लाभ मिळेल. या निर्णयामुळे हजारो माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.