ईडी रडारवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते; सकाळी ११ वाजल्यापासून कसून चौकशी सुरु

Published on -

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashatra) राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणा अधिक आक्रमक झाल्या असून अनेक मंत्री ईडी (ED) दरबारी पोहोचले आहेत. नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती जप्त झाल्यानंतर आता दिल्ली दरबारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईडीच्या रडारवर आहेत.

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (mallikarjuna kharge) यांची ईडीने सकाळी ११ वाजल्यापासून चौकशी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरगे यांची चौकशी नॅशनल हेराल्ड (national herald) प्रकरणात सुरू आहे.

खरगे यांच्या ईडी चौकशीनंतर दिल्लीच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेल्या आर्थिक अनियमिततेची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

भाजपचे (Bjp) नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी २०१२ मध्ये या प्रकरणी ट्रायल कोर्टात तक्रार दाखल केली होती. काही काँग्रेस नेते यंग इंडियन लिमिटेडद्वारा जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणाच्या फसवणूक आणि विश्वासघाताच्या प्रकरणात सहभागी होते, असा दावा या तक्रारीत करण्यात आला होता.

प्रकरण काय आहे?

२००८ मध्ये एजेएलची सर्व प्रकाशने बंद करण्यात आली होती. कंपनीवर ९० कोटींचं कर्जही झाले होते. त्यानंतर काँग्रेने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली.

या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा आदी संचालक होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे ७६ टक्के शेअर होते.

तर इतरांकडे २४ टक्के शेअर होते. काँग्रेस पक्षाने या कंपनीला ९० कोटींचे कर्जही दिले होते. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहन केलं होतं. २०१२ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!