ATM : आता एटीएम कार्डधारकांना मिळणार पाच लाख रुपयांची ‘ही’ विशेष सुविधा,कसे ते जाणून घ्या

ATM : प्रत्येकाकडे एटीएम कार्ड असल्यामुळे ते बँकेच्या लांबच लांब रांगेत उभे राहून पैसे काढत नाही. या एटीएम कार्डमुळे अनेक कमी सोयीस्कर झाली आहेत. आता याच कार्डधारकांना पाच लाख रुपयांची एक विशेष सुविधा दिली जात आहे.

परंतु, अनेकांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे त्यांना या सेवेचा लाभ घेता येत नाही. आता कार्डधारकांना याद्वारे अपघात विमा संरक्षण मिळत आहे. तुमच्याकडे जर एटीएम कार्ड असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात.

तुमच्या एटीएम कार्डसोबत एक विमा येतो, अनेकांना हे माहिती नसते. हा अपघात विमा संरक्षण असून तुम्हाला जेव्हा बँकेकडून तुम्हाला एटीएम कार्ड जारी केले जाते त्याच वेळी तुम्हाला हा विमा मिळतो

परंतु, अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांना एटीएम कार्डसह उपलब्ध असणाऱ्या या विमा संरक्षणाचा दावा करत नाही. जर तुम्हाला हा विमा घ्यायचा असेल तर त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत.

समजा जर तुमचे एटीएम कार्ड राष्ट्रीयकृत किंवा बिगर राष्ट्रीयीकृत बँकेने जारी केले असेल तर तुम्हाला एटीएम कार्ड 45 दिवस वापरल्यानंतर या विम्याचा दावा करता येतो.

तसेच जर तुमच्याकडे क्लासिक एटीएम कार्ड असेल तर तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. प्लॅटिनम कार्डधारकांना 2 लाख रुपये, मास्टर कार्डधारकांना 50 हजार रुपये, व्हिसा कार्डधारकांना 1.5 ते 2 लाख रुपये आणि प्लॅटिनम मास्टर कार्डधारकांना 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. जर तुमच्याकडे रुपे डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला 1-2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe