Digital PAN Card Process : आता झटक्यात बनेल आधार कार्डवरून डिजिटल पॅनकार्ड, अशी आहे प्रोसेस

Published on -

Digital PAN Card Process : आधारकार्ड प्रमाणे आता पॅन कार्डही गरजेचे कागदपत्र बनले आहे. तुम्ही आता आधार कार्डवरून डिजिटल पॅनकार्ड बनवू शकता. हि नवीन सेवा फिनो पेमेंट्स बँकेने सुरु केली आहे. पाहुयात संपूर्ण प्रोसेस.

फिनो ही टाय-अपसह, प्रोटीयसची पॅन सर्व्हिस एजन्सी म्हणून काम करणारी आणि पेपरलेस पॅन जारी करण्याची सुविधा देणारी पहिली पेमेंट बँक आहे. या बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, या करारामुळे प्रोटीअसला फिनो बँकेच्या १२.२ लाख मर्चंट पॉइंट्सच्या फिजिटल नेटवर्कद्वारे देशाच्या मध्यवर्ती भागात आपली पोहोच वाढवता येणार आहे.

असे मिळवा पॅन कार्ड

वापरकर्त्यांना आता फिनो बँक पॉइंट्सवर आधार-आधारित प्रमाणीकरणाद्वारे पॅन कार्डसाठी अर्ज करता येईल, ज्यासाठी कोणतेही दस्तऐवज सबमिट करणे किंवा अपलोड करणे गरजेचे नाही. वापरकर्त्यांना डिजिटल किंवा भौतिक स्वरूपात पॅन कार्ड निवडण्याचा पर्याय मिळणार आहे.

बँकेने असेही सांगितले की, नुकतीच सादर केलेली डिजिटल आवृत्ती किंवा ई-पॅन अर्ज केल्यानंतर काही तासांत अर्जदाराच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात येईल. ई-पॅन हे भौतिक पॅन कार्ड म्हणून स्वीकार्य आहे. तर, जे फिजिकल कार्ड निवडतात त्यांना त्यांचे पॅन कार्ड त्यांच्या आधारमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर 4-5 कामकाजाच्या दिवसांत उपलब्ध होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe