iPhone 13 : भारीच की! आता आयफोन 13 वर मिळत आहे 20 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट

iPhone 13 : Apple ने नुकतीच iPhone 14 सिरीज लाँच केली होती. Apple च्या प्रत्येक सीरिज प्रमाणेही ही सीरिजने ग्राहकांच्या मनाला भुरळ घातली आहे. परंतु, अजूनही iPhone 13 ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

कंपनीने यामध्ये जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिली आहेत. या मॉडेलची किंमत 69,900 रुपये इतकी आहे. यावर आता 20 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे.

जर तुम्ही iPhone 13 विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही तो खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. ऑफर्समुळे iPhone 13 कमी किमतीत मिळत आहे.

iPhone 13 ऑफर

फ्लिपकार्टवर iPhone 13 खूप कमी किंमतीत मिळत ​​आहे. तसेच त्यावर वेगवेगळ्या ऑफर्स मिळत आहे. त्याची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे परंतु,त्याच्या किमतीवर 5 टक्के डिस्काउंट उपलब्ध असल्यामुळे तो 65,999 रुपयांना विकला जात आहे.

iPhone 13 एक्सचेंज ऑफर

त्याशिवाय तुम्हाला आता एक्सचेंज ऑफरसह iPhone 13 खरेदी करता येईल. iPhone 13 फ्लिपकार्टवर 17,500 रुपयांपर्यंतच्या सवलतीसह उपलब्ध आहे. जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर नवीनतम मॉडेल सूचीमध्ये आलेल्या चांगल्या स्थितीतील फोनची देवाणघेवाण करावी लागेल.

बदललेल्या फोनचे तपशील टाकल्यानंतर, फोनवर किती सवलत दिली जाऊ शकते हे तुम्हाला समजेल. जर तुम्ही या ऑफरचा फायदा घेतला तर तुम्हाला फोनच्या किंमतीवर 17,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्यामुळे या फोनची किंमत तुमच्यासाठी फक्त 48,499 रुपये असू शकते.

Apple चे चाहतावर्ग आणि ग्राहक खूप आहेत. त्यामुळेच कंपनीच्या सर्व सीरिजला भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात असते. सर्व मॉडेलमध्ये कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन बदल करत असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe