WhatsApp feature : आता इंटरनेट बंदीनंतरही पाठवता येणार मेसेज, व्हॉट्सॲपने केली आणखी एका फीचरची घोषणा

WhatsApp feature : नवीन वर्षात व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक जबरदस्त भेट देणार आहे. कारण व्हॉट्सॲपने एका नवीन आणि जबरदस्त फीचरची घोषणा केली आहे.

कंपनीने प्रॉक्सी सपोर्टची घोषणा केली असून त्यामुळे आता जगभरातील युजर्स इंटरनेट बंदीनंतरही मेसेज पाठवू शकणार आहे. लवकरच हे फिचर युजर्सना वापरता येणार आहे.

असे करणार नवीन फीचर काम

या नवीन फीचरद्वारे, वापरकर्ते ॲपला एखाद्या संस्थेशी किंवा स्वयंसेवकांच्या सर्व्हरशी कनेक्ट करून संदेश पाठविण्यास सक्षम असतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या सक्रिय इंटरनेट कनेक्शनची गरज नाही. तसेच यूजर्सला कोणत्याही प्रकारचे पेमेंट करावे लागणार नाही.

प्रॉक्सी सर्व्हरशी कनेक्ट झाल्यानंतर युजर्सची गोपनीयता अबाधित राहील आणि सुरक्षेबाबत काळजी करण्याची गरज नाही, असे व्हॉट्सॲपने म्हटले आहे. प्रॉक्सी सर्व्हरवरही WhatsApp एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. व्हॉट्सअॅपने प्रॉक्सी सर्व्हरशी कनेक्ट करण्यासाठी एक चार्टही शेअर केला आहे.

या कारणामुळे बंद केले नेट 

सहसा, दंगल किंवा गोंधळाच्या वेळी, सोशल मीडिया ॲप्स सरकारद्वारे अवरोधित केले जातात आणि काहीवेळा काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात येते. गत वर्षी, इराण सरकारने निषेधादरम्यान व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम ब्लॉक केले होते. आम्हाला कोणत्याही प्रकारचे इंटरनेट बंद नको आहे, असे व्हॉट्सॲपने आता म्हटले आहे.

अशी चालू करा सेटिंग

यासाठी सर्वप्रथम तुमचे व्हॉट्स ॲप अपडेट करा. त्यानंतर ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन स्टोरेज आणि डेटाच्या पर्यायावर टॅप करा आणि प्रॉक्सी निवडा. आता प्रॉक्सी पत्ता भरून सेव्ह करा. एकदा कनेक्ट झाले की तुम्हाला एक चेकमार्क दिसेल आणि इंटरनेट बंद असतानाही तुम्ही संदेश पाठवू शकाल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe