नवभारत नंतर आता नवमहाराष्ट्र, भाजपची नवी घोषणा

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजप आणि केंद्र सरकारकडून देशाता नवा भारत असा उल्लेख केला जात आहे. नेत्यांची भाषणे आणि सरकारी जाहिरातींमध्येही हा नवा भारत आहे, अशा आवर्जुन उल्लेख केल्याचे दिसून येते.

आता महाराष्ट्रासंबंधी भाजपने ही घोषणा केली आहे. काल रात्री मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपने केलेल्या एका ट्विटमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे.

ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र भाजपने ट्वीट केले आहे. यात मी पुन्हा येईन ….. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी! जय महाराष्ट्र असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
दुसऱ्या बाजूला स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना मार्गदर्शन करत असतानाचा फोटो शेअर केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस स्वत: गुरुवारी सकाळी पुढील रणनीती कशी असेल याबाबत माहिती देणार आहेत. मात्र, यापुढे नव महाराष्ट्र ही कॅचलाइन भाजपकडून वापरली जाणार हे, दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe