आता तुमच्या घराचे स्वप्न होणार साकार; ‘या’ बँका Home Loan देताहेत कमी व्याजदरात

Published on -

आपलं स्वतःचं घर असावं, हे प्रत्येक मध्यमवर्गीय भारतीयाचं सर्वात मोठं स्वप्न असतं. मात्र त्यासाठी खूप पैसा लागतो. पण बँकांकडून देण्यात येणारं होम लोन यासाठी खूप मदत करतं.

जर तुम्ही एवढ्यात घर घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या बँकांकडून देण्यात येणारे होम लोन आणि त्यावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल माहिती देणार आहोत.

अशा अनेक बँका आहेत ज्या 6.4 ते 6.5% व्याजदराने होम लोन देतात. तसेच एक महत्वाची गोष्ट अशी की, लोन घेणाऱ्या व्यक्तीच्या सिबिल स्कोअरवर त्याचा व्याजदर अवलंबून असतो.आता पाहूयात सर्वांत कमी व्याजदरावर होमलोन देणाऱ्या बँका कोणत्या आहेत ते.

युनियन बँक ऑफ इंडिया – हि बँक 6.8 टक्के रेपो लिंक्ड लेंडिंग रेटने होम लोन देत आहे. बँक किमान 6.4 टक्के आणि कमाल 7.25 टक्के दराने होमलोन देत आहे.

बँक ऑफ इंडिया – बँक ऑफ इंडिया 6.85 टक्के RLLR वर होमलोन देत आहे. बँक किमान 6.5 टक्के आणि कमाल 8.2 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे.

कोटक महिंद्रा बँक – ही बँक सर्वांत कमी दरात होम लोन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. बँक सध्या 6.50 टक्के RLLR सह लोन देत आहे. ही खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक बँक आहे.

बँक ऑफ बडोदा – हि बँक होम लोन देण्यापूर्वी तुमच्या संपूर्ण क्रेडिट इतिहासाची तपासणी करते. त्यानंतर पात्र कर्जदारांना कमी दराने कर्ज देते.ही बँक घर खरेदीसाठी किमान 6.5 टक्के आणि कमाल 7.85 टक्के व्याजदराने कर्ज देऊ करत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र – ही बँक 6.8 टक्के RLLR सह होम लोन देत आहे. बँक त्यावर किमान 6.4 टक्के आणि कमाल 7.8 टक्के व्याज देत आहे. तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वांत कमी दरात होम लोन मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!