अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- अलीकडे चोरट्यांच्या चोरी करण्याच्या अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या घटना समोर येत आहेत. आतापर्यंत सोने, चांदी, किमती वस्तू,वाहने,
कधी कधी पाळीव प्राणी देखील,दरोड्यासह गंभीर चोऱ्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची चोऱ्या झालेले प्रकार ऐकवात येत होते. मात्र चोरांनी आता तर कहररच केला असून,
चक्क स्मशानभूमीतील लोखंडी शवदाहीनीच चोरून नेल्याची अत्यंत संतापजनक घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. चोरट्यांच्या या करनाम्यामुळे मात्र या परिसरातील मयत व्यक्तींचा अंत्यविधी करण्याची गैरसोय झाली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी येथील ग्रामस्थांची गावाजवळ स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीच्या आजूबाजूला जवळपास लोकवस्ती नसल्यामुळे हा एकांत परिसर आहे.
नेमका याचा फायदा उचलत अज्ञात भुरट्या चोरांनी चक्क स्मशानभूमीतील शवदाहीनीच चोरून नेल्याचा प्रकार एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आल्यानंतर उपस्थितांच्या लक्षात आला.
त्यानंतर येथील ग्रामस्थांनी देखील कपाळाला हात लावत चोरांच्या या कृत्याचा निषेध व्यक्त करत, कशाची चोरी करावी याचे देखील भान आता चोरट्यांना राहिले नसल्याचा म्हणत आपला संताप व्यक्त केला.
या प्रकारामुळे ग्रामस्थांची मृतदेहावर अंत्यविधी करण्याची गैरसोय होऊन बसल्याने स्मशानभूमीला देखील संरक्षण देण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम