अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- कोरोनाची तिसरी लाट गरीबांसाठी नव्हे तर गरीबांना लुटणाऱ्यांसाठी येणार आहे ! कोरोनामुळे माणसं भांबावली, त्यांनी डॉक्टरची पदवी पाहिली नाही, तज्ञ पाहिला नाही.
आणि डॉक्टरांनीही रूग्णांना लुटण्याचा तडाखा उठविला. ज्यांनी रूग्णांना लुटलं त्यांचे वाटोळे होणार ! गरीबांचा तळतळाट कधी कोणत्या रूपाने बसेल हे सांगता येणार नाही. असे मत इंदोरीकर महाराज यांनी व्यक्त केले.
यावेळी इंदुरीकर यांनी कोरोना रूग्णांकडून भरमसाठ बिले उकळणाऱ्या डॉक्टरांवर जोरदार प्रहार केला. कोरोनाच्या काळात बाधित रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बिले वसूल करण्यात आली.
यात गोरगरीब जनतेचे खूप हाल झाले. अनेकांनी उसनवारी, कर्ज काढून ही बिले भरली तर अनेकांनी प्रसंगी दागीणे मोडून रूग्णालयांची बिले भरली.
पण दुर्दैवाने एवढे प्रयत्न करून देखील काही रूग्ण वाचले नाहीत. त्यामुळे अनेक कुटुंब आज उघड्यावर आली असल्याचे देखील ते म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम