सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर वाहनांसाठी आता हा नियम

Ahmednagarlive24 office
Published:

 India News :एखादा नवा नियम येणे किंवा अस्तित्वात असलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे, यासाठी आपल्याकडे एखादी घटना घडावी लागते.

अपघातांच्या बाबतीत आता तसेच झाले आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मुंबईजवळ कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

अर्थात जुनाच नियम नव्याने आणि सक्तीने राबविण्यात येणार आहे. कारमध्ये बसलेल्या सर्व लोकांना आता सीट बेल्ट लावणे अनिवार्य असणार आहे.

सीट बेल्ट न लावता पकडल्यास दंडही भरावा लागणार आहे. येत्या तीन दिवसांत यासंबंधीचा आदेश काढला जाणार असून त्याची तत्काळ देशभर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यासंबंधी गडकरी यांनी सांगितले की, याआधी फक्त ड्रायव्हर आणि सहप्रवाशांसाठी सीट बेल्ट न लावल्यास दंड होता, परंतु आता मागील सीटच्या प्रवाशांना देखील सीट बेल्ट लावाने अनिवार्य केले जाणार आहे.

ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवरील सीट बेल्टचा अलार्म असेल. कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास एक हजाराचा दंड आकारला जाईल, असे गडकरी म्हणाले.

आता या नियमाची अंमलबाजणी करण्याचे काम पोलिसांकडे येईल. त्यातून वाहनचालक आणि पोलिसांमध्ये वाद होण्याची आणि यातून काही गैरप्रकाराच्या तक्रारी येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe