ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्याने करा आता बी टोकण; लागवडी वरील खर्च होणार कमी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Ahmednagar News :- शेतकरी शेतामध्ये पिकांची पेरणी व रोपांची लागवड करताना बऱ्याच वेळा एकेरी रोपांच्या संख्या योग्य त्या प्रमाण ठेवता येत नाही. कधी त्याची लागवड दाट तर कधी विरळ होते. दाट झालेल्या रोपांना पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होतो.

संख्या जास्त झाल्यास शेतकऱ्यांना रोपांची नंतर विरळणी करून घ्यावी लागते. रोपा मध्ये अंतर असल्यास त्यांची खत पाणी याचे नियोजन करणे सोपे जाते.पण शेतकऱ्यांनी लागवडीसाठी वेळ आणि श्रमात बचत करणारे यंत्रे वापरली नाहीत. तर त्याचा खर्च आणि वेळ या दोन्हीत वाढ होणार आहे.

यंत्राच्या साह्याने लागवड केल्यास रोपांची संख्या देखील योग्य प्रमाणात राखले जाते.व रोपे दाट होत नाहीत. यंत्राच्या साह्याने अंतर मशागत व खते देण्याचे काम एकाच वेळी पटकन करता येते.टोकण लागवड पद्धत शेतकर्यासाठी एक वरदान आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले बहुपीक टोकण यंत्र विकसित केले आसून त्याच्या साहाय्याने अंतर्गत मशागतीची व पेरणीची कामे केली जात आहेत.तर शेतातील आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्याला झाला आहे. ट्रॅक्‍टरचलित यंत्राच्या साह्याने लागवडी वरील होणारा खर्च व लागणार वेळ कमी होण्यास मदत झाली आहे.

फुले बहुपीक टोकण यंत्र फायदे व वैशिष्ट्ये :

सूर्यफूल, गहू, ज्वारी, सोयाबीन,हरभरा, मका, भुईमूग  इत्यादी पिकांची टोकण करण्यासाठी उपयुक्त असते.

या यंत्राच्या वापराने शेतामध्ये लागणारी मजुरी,वेळ आणि लागणारे कष्ट यामध्ये खूपच बचत होते.

पारंपारिक पद्धती मध्ये होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत 40 ते 50 टक्के बचत होते.

यासोबतच दाणेदार खतांची देखील व्यवस्थित पेरणी करता येते.

पारंपरिक पद्धतीपेक्षा वेळेमध्ये 50 ते 60 टक्के बचत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe