RTO Services : जर तुम्हाला आरटीओशी (RTO) निगडित एखादे काम करायचे असेल तर आता तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या (Government offices) चकरा माराव्या लागणार नाहीत. आता ही कामे तुम्हाला घरबसल्या करता येऊ शकणार आहे.
मात्र यासाठी आधार कार्ड (Aadhar Card) बंधनकारक असणार आहे. आधार पडताळणीद्वारे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहन चालविण्याचा परवाना (Driving license), वाहन नोंदणी (Vehicle registration) यांसारख्या 58 सेवा ऑनलाइन (Online service) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आता आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत
मंत्रालयाने शनिवारी सांगितले की सरकारी कार्यालयांना भेट न देता संपर्करहित पद्धतीने अशा सेवा प्रदान केल्याने नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचेल. याशिवाय प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये जाणाऱ्यांची संख्याही कमी होईल, त्यामुळे कामाची परिणामकारकता वाढेल.
तुम्ही घरबसल्या या सेवांचा लाभ घेऊ शकता
ज्या ऑनलाइन (Online) सेवांसाठी नागरिक स्वेच्छेने आधार पडताळणी करू शकतात त्यामध्ये शिकाऊ परवाना, ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत आणि ड्रायव्हिंग दाखविल्याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण यासारख्या सेवांचा समावेश होतो.
आधार नसतानाही तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता
मंत्रालयाने 16 सप्टेंबर रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली. ज्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नाही तो इतर काही ओळखीचा पुरावा दाखवून थेट सेवांचा लाभ घेऊ शकतो.