OnePlus Q2 Pro : आता घरबसल्या घेता येणार थिएटरची मजा, लाँच होणार वनप्लसचा 65 इंचाचा टीव्ही

Ahmednagarlive24 office
Published:

OnePlus Q2 Pro : वनप्लस आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्ट टीव्ही घेऊन येत आहे. हा टीव्ही थिएटरची मजा देईल. या टीव्हीची 65 इंच स्क्रीन असणार आहे.

कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्ट टीव्ही OnePlus Q2 Pro लाँच करणार आहे. हा टीव्ही 4K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

काय असणार खासियत

कंपनीच्या आगामी OnePlus TV मध्ये 4K रिझोल्यूशनसह 65-इंच QLED पॅनेल आणि स्मूथ अॅनिमेशनसाठी उच्च 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे. हा टीव्ही OxygenPlay साठी OnePlus च्या कस्टम Android स्किनसह Google TV असणार आहे.

तसेच या टीव्हीमध्ये 70W स्पीकर असल्याचे सांगितले जात आहे, जे डॉल्बी अॅटमॉसद्वारे ट्यून केले जाणार आहे. स्टोरेजचा विचार केला तर तो ऑनबोर्ड 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजने सुसज्ज असणार आहे .

केव्हा होणार लाँच?

दरम्यान या TV चे डिझाईन, किंमत आणि लॉन्च तारखेबद्दल माहिती समोर आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe