Ola Subscription Plan : ओला ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माण करणारी कंपनी आहे. ओलाने आपल्या ग्राहकांना नवीन वर्षातील जानेवारी महिन्याच्या अखेरीस एक नवीन भेट दिली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना त्याचा खूप फायदा होणार आहे.
कारण कंपनीने दोन नवीन सेवा सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्तात चालवू शकता. कंपनीच्या या सेवेचे नाव ओला केअर आणि ओला केअर प्लस असे आहे. दरम्यान ही सेवा काय आहे त्याचा कसा फायदा होईल ते जाणून घेऊयात.
ओलाकडून सुरु करण्यात आलीय नवीन सेवा
ओलाकडून सबस्क्रिप्शन प्लॅनची नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. आता दोन प्रकारच्या सेवा देण्यात येणार आहे. या सबस्क्रिप्शन प्लॅनला कंपनीने ओला केअर आणि ओला केअर प्लस असे नाव दिले आहे.
ही असेल खासियत
ग्राहकांना ओला केअर आणि ओला केअर प्लसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिल्या जाणार आहेत. यामध्ये सेवेवर मोफत श्रम, चोरी सहाय्य हेल्पलाइन समर्थन, रस्त्याच्या कडेला सहाय्य, पिक-ड्रॉपसह मोफत घर सेवा, मोफत उपभोग्य वस्तू, 24/7 डॉक्टर तसेच रुग्णवाहिका सेवा इत्यादीचा समावेश असणार आहे.
किती असणार किंमत
ओला केअरसाठी कंपनीकडून दोन हजार रुपये तसेच जीएसटी आकारला जाणार आहे, तर ओला केअर प्लससाठी कंपनी जीएसटीसह 2999 रुपये आकारण्यात येणार आहे. या योजना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा अनुभव केंद्राद्वारे खरेदी करता येतील.
याचा समावेश नसणार
तसेच कंपनीच्या वेबसाइटवर या सेवांमध्ये काय नसणार याची यादी दिली आहे. कंपनीने असे म्हटले आहे की अशी कोणतीही घटना ज्यामध्ये झीज जाणूनबुजून झाली आहे. ड्रायव्हर नशेच्या अवस्थेत किंवा ड्रग्ज, विषारी पदार्थ किंवा अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली आहे. अशा अनेक गोष्टी यात नसणार आहेत.
याबाबत सीएमओ यांनी दिली माहिती
याबाबत ओलाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अंशुल खंडेलवाल यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, “ग्राहक-केंद्रित ब्रँड असल्याने सेवेला नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. आता या प्लॅनद्वारे, आम्ही ग्राहक सेवेच्या अनुभवाची पूर्णपणे पुनर्कल्पना करत आहोत आणि आमच्या ग्राहकांना विक्रीनंतरची सर्वोत्तम सेवा आणण्याचे आमचे ध्येय असणार आहे. सबस्क्रिप्शन योजना ग्राहकांना आमच्या सेवा नेटवर्कमध्ये 360-डिग्री प्रवेश प्रदान करते.
ओला केअरचे ओला केअर आणि ओला केअर+ असे दोन सबस्क्रिप्शन प्लॅन आहेत. ओला केअर योजनेच्या फायद्यांमध्ये सेवेवर मोफत श्रम, चोरी हेल्पलाइन आणि रस्त्याच्या कडेला मदत आणि पंक्चर मदत यांचा समावेश आहे. तर ओला केअर+ फायद्यांमध्ये वार्षिक सर्वसमावेशक निदान, मोफत होम सर्व्हिस आणि पिक-अप/ड्रॉप, मोफत उपभोग्य वस्तू आणि २४/७ डॉक्टर आणि रुग्णवाहिका सेवा यांचा समावेश होतो.