NPS : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अर्थात NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा योजनेतून बाहेर पाडण्याचे नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. आता पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने निधी काढण्यासाठीआणि योजनेतून बाहेर पडण्यासाठी त्वरित बँक खाते व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे.
समजा तुम्ही NPS मध्ये एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवणुकीतून सुरुवात करू शकता, तुम्ही हे खाते ७० वर्षापर्यंत चालू ठेवू शकता. या योजनेमध्ये कर कपातीचा लाभ आणि वार्षिक 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कर सवलत मिळेल.
या नियमांनुसार, पेनी-ड्रॉप पद्धतीने ग्राहकांच्या बँक खात्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. या बाबत पीएफआरडीएच्या 25 ऑक्टोबरच्या परिपत्रकानुसार, सत्यापन प्रक्रियेसाठी नाव जुळणे तसेच पैसे काढणे आणि पैसे काढण्याच्या विनंत्या खूप गरजेच्या आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. इतकेच नाही तर, या ग्राहकांचे बँक खाते तपशील बदलण्यासाठी, पेनी ड्रॉप पडताळणी यशस्वी होणे गरजेचे असणार आहे.
नियमात झाले महत्त्वाचे बदल
पेन्शन रेग्युलेटरी ऑथॉरिटीने असे स्पष्ट केले आहे की CRA पेनी ड्रॉपची पडताळणी करण्यात अयशस्वी झाले तर या NPS मधून बाहेर पडण्याची किंवा पैसे काढण्याची कोणतीही विनंती, ग्राहकाच्या बँक खात्यातील डेटामध्ये बदल स्वीकारला जात नाही.
समजा पेनी ड्रॉप अयशस्वी झाला तर ग्राहकाच्या बँक खात्याच्या तपशिलांमध्ये बदल करण्याबाबत संबंधित नोडल कार्यालयात विहित प्रक्रियेनुसार निर्णय घेण्यात येईल. तर, सीआरए पेनी ड्रॉप अयशस्वी झाला तर ग्राहकाला त्याच्या मोबाइल नंबर आणि ईमेलवर सूचित करण्यात येईल.
जाणून घ्या NPS एक्झिट नियम
पीएफआरडीएच्या नियमांनुसार, समजा एखाद्या ग्राहकाने एनपीएसमध्ये जमा केलेली एकूण रक्कम आणि व्याज 5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, तर तो संपूर्ण रक्कम एकत्र काढू शकतो. परंतु, यापेक्षा जास्त असेल तर 40 टक्के रक्कम पेन्शनसाठी ठेवण्यात येईल. उरलेली 60 टक्के रक्कम एकत्र काढता येते हे लक्षात ठेवा.