pune-Nashik Expressway:- महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी पुणे आणि वेगाने विकसित होत असलेले व आयटी शहर म्हणून उदयास येत असलेले नाशिक ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वपूर्ण शहरे आहेत. या दोन्ही शहरांच्या दरम्यान होणारी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर असून अनेक प्रवासी दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात.
सध्या जर आपण पुणे ते नाशिक हे अंतर पाहिले तर ते साधारणपणे सव्वादोनशे किलोमीटर आहे व साडेपाच तास इतका वेळ हे अंतर कापण्यासाठी लागतो. या दोन्ही शहरांमधील अंतर कमी करण्याकरिता तसेच वेळ कमी लागावा यासाठी महत्वाचे म्हणजे होणारी दररोजची वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्दिष्टाने देखील काही नवीन पर्यायी मार्ग प्रस्तावित करण्यात आलेले आहेत.
यामध्ये पिंपरी चिंचवड येथील तळवडे व चिखली जवळ असलेल्या महाळुंगे या ठिकाणाहून हा नवीन प्रस्तावित मार्ग सुरू होणार आहे. पुणे आणि नाशिक या शहरातील अंतर साधारणपणे पन्नास किलोमीटरने कमी होण्यासाठी हा प्रस्तावित महामार्ग खूप महत्त्वाचा असणार आहे. या दृष्टिकोनातून आपण हा पुणे ते नाशिक महामार्गाचे स्वरूप कसे असणार आहे व त्यात काय बदल केले जाणार आहेत? याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.
पुणे ते नाशिक द्रूत्तगती महामार्गामुळे होणार दोन्ही शहरातील अंतर कमी
पिंपरी चिंचवडच्या तळवडे व चिखली लगत असलेल्या म्हाळुंगे या ठिकाणहून हा नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला असून यामुळे पुणे व नाशिक या दोन्ही शहरातील अंतर 50 किलोमीटर कमी होण्यास मदत होणार आहे. हा महामार्ग नाशिक फाटा म्हणजेच कासारवाडी ते चाकण पर्यंत एलिवेटेड असणार असून यासोबतच पुणे ते नाशिक हाय स्पीड लोहमार्ग देखील प्रस्तावित आहे.
त्यामुळे प्रस्तावित एक्सप्रेसवे आणि हा लोहमार्ग व जुना मार्ग या तीनही मार्गांचा फायदा पुणे आणि नाशिक दरम्यान प्रवासाला होणार आहे. मध्ये जर पुणे नाशिक या जुन्या महामार्गाचा विचार केला तर नाशिक फाटा ते चाकण पर्यंत सहा लेनचा केला जाणार आहे व त्याचा रुंदीकरण हे प्रस्तावित आहे.
तसेच हा महामार्ग उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड करण्याचा देखील प्रस्ताव आहे. प्रस्तावित असलेल्या या नवीन महामार्गाचा बराच फायदा पुण्याला होणार आहे. तसेच यामध्ये तळवडे व महाळुंगे एकमेकांना जोडण्याकरिता एक पुल बांधला आहे. तसेच चाकण व आंबेठाण, माळुंगे व निघोजे इत्यादी भागातील जो काही औद्योगिक पट्टा आहे त्यातील सर्व वाहतूक याच पुलावरून सुरू आहे. तसेच चिखली व मोई या ठिकाणांना जोडणाऱ्या पुलामुळे देखील नवीन रस्ता कनेक्ट होणार आहे.
शहराच्या विकासासाठी हा रस्ता खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तसेच पीएमआरडीएच्या रिंग रोडला देखील हा नवीन रस्ता जोडला जाणार आहे. त्यामुळे नक्कीच तळवडे, चिखली तसेच मोशी, डुडुळगाव, चिरोली इत्यादी उपनगरी ही रिंग रोडच्या देहू व आळंदी या रस्त्याच्या माध्यमातून या नवीन रस्त्याला जोडली जाणार आहेत.
असा असणार आहे हा नवीन मार्ग
पिंपरी चिंचवड मधील तळवडे तसेच महाळुंगे, आंबेठाण, कोरेगाव, किवळे, कडूस, चास, घोडेगाव तसेच जुन्नर, अकोले, संगमनेर आणि नाशिक अशा हा नवीन मार्ग असणार आहे. या महामार्गामुळे पिंपरी चिंचवड उद्योग नगरी सह खेड, आंबेगाव तसेच जुन्नर, संगमनेर आणि नाशिक इत्यादी जोडले जाणार आहेत.