Maharashtra news : केंद्र सरकारने लष्करी भरतीसाठी आणलेल्या ‘अग्निपथ’ योजनेस देशभरात विरोध होत आहे. तर सरकारच्या विविध विभागांमधून अग्निवीरांना भरती आणि विविध सवलतींच्या घोषणा होत आहेत.
अशातच अग्निवीरांना महिंद्रा समूहामध्ये नोकरी देण्याची घोषणा आनंद महिंद्रा यांनी केली आहे. आता कॉर्पोरेट जगतात यासाठी स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे.
आनंद महिंद्रा यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे.
अग्निपथ योजनेला होत असलेला विरोध व त्यावरून होत असलेला हिंसाचार वेदनादायी आहे. मागील वर्षी या योजनेवर विचार सुरू करण्यात आला होता. या योजनेमुळं शिस्तबद्ध व कुशल तरुण तयार होतील.
त्यातून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी वाढतील, असं मत त्यावेळी मी नोंदवलं होतं. आजही मी त्यावर ठाम आहे. कॉर्पोरेट जगतासाठी अग्निवीरांची भरती ही एक संधी आहे.
नेतृत्वगुण, संघभावना व शारीरिक प्रशिक्षण घेतलेले अग्निवीर हे ऑपरेशन्स, अॅडमिनिस्ट्रेशन व सप्लाय चेन मॅनेजमेंट अशा अनेक विभागांमध्ये काम करू शकतील. महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित व सक्षम तरुणांना नोकरी घेण्यास इच्छुक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.