Office Saving Schemes : भारतातील पोस्ट ऑफिसद्वारे अशा अनेक योजना चालवल्या जात आहेत ज्या प्रत्येकाला श्रीमंत बनवत आहेत. जर तुम्हीही सध्या गुंतवणूक करून मोठी रक्कम कमावण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी पोस्टाची अशीच एक योजना घेऊन आलो आहोत.
सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना प्रत्येकाला श्रीमंत बनवण्याचे काम करत आहे. यामध्ये तुम्ही जोखीम न घेता पैसे गुंतवून चांगली कमाई करू शकता. तुम्ही या योजनेमध्ये 5 लाखांपर्यंत प्रीमियम भरल्यास, तुम्हाला एकरकमी उत्पन्न मिळते. टाइम डिपॉझिट (TD), ही एक छोटी बचत योजना आहे. त्याची मर्यादा १,२,३,४ आणि ५ वर्षे आहे.
योजनेत जमा केलेल्या रकमेवर वार्षिक व्याजाचा लाभ सहज मिळू शकतो. या योजनेत 1 वर्षाच्या कालावधी 6.90 टक्के, 2 वर्षांच्या कालावधीसाठी दरवर्षी 7 टक्के व्याजदर मिळत आहे.
यासोबतच 3 वर्षांच्या कालावधीसाठी दरवर्षी 7 टक्के व्याजदर आहे. 5 वर्षांच्या कालावधीसाठी हा दर 7.5 टक्के आहे. अशातच जर तुम्ही आता गुंतवणूक करण्याची ही संधी गमावली तर तुम्हाला भविष्यात पच्छाताप होऊ शकतो.
5 लाखांच्या गुंतवणुकीवर किती व्याजदर
पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट (TD) योजना लोकांची मने जिंकत आहे. तुम्ही 5 वर्षांसाठी यात 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 7 लाख 24 हजार 974 रुपये सहज मिळतील. यानुसार, 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 2,24,974 रुपये फक्त व्याजाच्या स्वरूपात मिळतील. तुम्ही या योजनेअंतर्गत एकल किंवा संयुक्त खाते उघडू शकता.